पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या देशातील स्मार्ट सिटी योजनेला आता
'मायक्रोसॉफ्ट' कंपनीचाही हातभार लागणार आहे.
- भारतात आधुनिक शहरांच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या 'स्टार्ट अप्स'ना मायक्रोसॉफ्टच्या 'एझ्यूर' क्लऊड कम्प्युटिंगअंतर्गत ८० लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाणार आहे.
- 'एझ्यूर' उपक्रमांतर्गत पुढील वर्षभराच्या काळात ५० 'स्टार्ट अप' सुरू करण्यात येणार असून, भारतात किमान ५० स्मार्ट सिटींच्या उभारणीत हे 'स्टार्ट अप्स' महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी व्यक्त केली.
- स्मार्ट सिटीच्या उभारणीसाठी स्टार्ट अप्सना मार्गदर्शन करण्यासाठी 'जस्टडायल', 'पेटीम' आणि 'स्नॅपडिल' या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत भागीदारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले
राज्यात ५० डिजिटल
व्हिलेज
महाराष्ट्र राज्यात २०१६
च्या अखेरपर्यंत ५० "स्मार्ट व्हिलेज‘ची निर्मिती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
- मायक्रोसॉफ्ट कंपनी सरकारला यासंदर्भात मदत करणार आहे
- राज्यातील मेळघाटमधील हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून पहिले डिजिटल व्हिलेज ठरले आहे.
स्मार्ट
सिटी अंतर्गत महाराष्ट्रातून निवड झालेली शहरे
१)
नवी मुंबई, २) नाशिक, ३) ठाणे, ४) बृहन्मुंबई, ५) अमरावती, ६) सोलापूर,७) नागपूर, ८) कल्याण-डोंबिवली, ९) औरंगाबाद, १०) पुणे
No comments:
Post a Comment