जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने गेल्या
३६ वर्षांतील एक कुटुंब एक मूल हे धोरण रद्द
केल्याची घोषणा केली आहे. चीनची लोकसंख्या १. ३ अब्ज
इतकी आहे.
नवीन धोरणानुसार एका जोडप्याला २ मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कुटुंब नियोजन धोरणातील हा मोठा बदल कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या पक्षाने जाहीर केला.
काय आहे एक मूल धोरण?
- चीनमध्ये एक मूल धोरण १९७९ मध्ये लागू करण्यात आले. मोठया प्रमाणावर वाढणाऱ्या लोकसंख्येला नियंत्रित करण्यासाठी हे धोरण लागू लागू करण्यात आले होते.
- ग्रामीण भागात पहिली मुलगी झाल्यास दोन मुलांना परवानगी व शहरी भागात काहीही झाले तरी एकाच मुलास परवानगी असा नियम करण्यात आला.
- चीनमधील अल्पसंख्यांक समाजाला एकापेक्षा अधिक मूलाची परवानगी देण्यात आली होती.
- नोव्हेंबर २०१३ मध्ये काही जोडप्यांना त्यांच्यापैकी कुणीही एक एकुलता असेल तर दोन मुले जन्माला घालण्यास परवानगी देण्यात आली.
का घेण्यात आला हा निर्णय?
- चीनमध्ये वृद्धांची संख्या जास्त असून एक मूल धोरणामुळे त्यांची काळजी घेण्यासही कोणी नाही.
- चीनची अर्थव्यवस्था मोठया प्रमाणावर वाढत असून त्यासाठी उद्योगांमध्ये काम करण्यास सक्षम असलेल्या युवकांची संख्या वाढणे अतिशय आवश्यक होते.
युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार, २०५०
पर्यंत चीनमधील सुमारे ४४० दशलक्ष लोकांचे वय ६०
वर्षांपेक्षा जास्त होईल.
· भारतात राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात १९५२ साली करण्यात आली. कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा भारत पहिला देश ठरला.
No comments:
Post a Comment