राजीव
गांधी खेलरत्न अभियान (RGKA) ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. ती पूर्वीच्या पंचायत
युवा क्रीडा और खेल अभियान (PYKKA) योजनेच्या
जागी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली
योजनेची
उद्दिष्ट आहेत :
ग्रामीण
तरुणांमध्ये असलेल्या उपलब्ध आणि संभाव्य क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी
तालूका (ब्लॉक) पातळीवर एक स्पर्धेचे आयोजन करणे.
या
योजनेअंतर्गत महत्वाच्या तरतुदी:
- दोन्ही आंतर आणि बाह्य क्रीडा प्रकारांसाठी (outdoor and indoor sports disciplines) देशातील प्रत्येक ब्लॉक मध्ये सहा ते सात एकर जागेवर १.६ करोड रुपये खर्च करून एक क्रीडा संकुलाचे बांधकाम करणे. (बाह्य आंतर क्रीडा क्रीडांगण बांधणीसाठी आणि आंतर क्रीडेसाठीच्या खेळांसाठी असलेल्या संकुलासाठी प्रत्येकी ८० लाख रुपये)
- क्रीडा उपकरणासाठी १५ लाख रुपये रु. आणि फर्निचरसाठी १.५ लाख क्रीडा विभागाकडून प्रदान करण्यात येतील.
योजनेच्या
अंतर्गत ब्लॉक, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खालील क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील.
- ग्रामीण क्रीडा स्पर्धा
- केवळ महिलांसाठी क्रीडा स्पर्धा
- ईशान्य
भारतातील खेळ स्पर्धा
- नक्षल प्रभावित भागात क्रीडा स्पर्धा
No comments:
Post a Comment