Tuesday, 17 November 2015

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना

राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजना सुरु केली आहे.
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
गावातील संसाधनाची उत्पादकता व पर्यायी रोजगार संधी वाढवून वनावरील अवलंबित्व कमी केल्यास मानव वन्यप्राणी संघर्ष कमी होऊन सहजीवन प्रस्थापित करणे या योजनेचा उद्देश आहे.
योजनेचा उद्देश
  • गावातील जन, जल, जंगल, जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे.
  • गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे. शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे.
  •  पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे.
  • मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणे.
  • गावकऱ्यांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे. व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे

योजनेचे निकष
  • ‘जन-वन विकास’ योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच ग्राम परिस्थितीकीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
  • अशा समितीमार्फत गावांचा व वनांचा विकास साधला जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत ग्राम परिस्थितीकीय विकास कार्यक्रम राबविण्यात येणाऱ्या गावांच्या ग्रामसभांनी सर्व प्रथम सदर कार्यक्रम राबविण्यास तयार असल्याचा ठराव घेणे आवश्यक आहे.
  • सदर ठरावामध्ये गावाला मिळणारे फायदे घेण्यासाठी कुऱ्हाड बंदी, चराई बंदी, भाकड गुरांची संख्या कमी करून दुधाळ जनावरे पाळणे, सर्व गुरांचे लसीकरण करणे, गुरांना गोठ्यातच चारा पुरविणे, वन वनवा नियंत्रण व संरक्षण कामात सहकार्य करणे, गौण खनिजाचा ह्रास थांबविणे.
  • या बाबीमध्ये गावांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडण्यास ग्रामसभेची संमती घेणे आवश्यक राहील. 
भारतातील वाघांबद्दल माहिती
  • भारतात जगातील एकूण वाघांच्या ७०% वाघ वास्तव्य करतात.
  • २००६ मध्ये भारतात १४११ वाघ होते ती संख्या २०११ साली १७०६ आणि २०१४ सालच्या गणनेनुसार २२२६ इतकी झाली.
  • प्रकल्प टायगर अंतर्गत नियंत्रित भारतात एकूण  ४८ व्याघ्र प्रकल्प आहेत. 
  • २०१४ सालच्या गणनेनुसार वाघांचे निवासस्थान असणारे प्रमुख राज्य:
1.    कर्नाटक - ४०६
2.    उत्तराखंड - ३४०
3.    मध्य प्रदेश - ३०८
4.    तामिळनाडू - २२९
5.    महाराष्ट्र - १९०

 महाराष्ट्र राज्याचे व्याघ्रदूत म्हणून ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights