Thursday, 12 November 2015

‘प्रथम’चे ‘लाखात एक’ अभियान

देशभरातील हजारो शाळांमधील विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि साधी गणितेही सोडविता येत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन देशभरातील एक लाखाहून अधिक वस्त्या व खेडय़ांमध्ये ‘लाखात एक’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे.
  • सर्वसामान्य मुलांचे पालक, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या आणि शिक्षक अशा सर्वाना एकत्र घेऊन  ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
  • देशातील एक लाखांहून अधिक वस्त्यांमधील मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी  प्रयत्न केला जाणार आहे.
  • केवळ शाळा व शिक्षकांना दोष देण्यापेक्षा शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यादृष्टीने वस्ती पातळीवर आणि खेडय़ांमध्ये काम केले जाणार आहे.
  • मुंबईत तीन हजार तर महाराष्ट्रात सुमारे १५ हजाराहून अधिक वस्त्या व खेडय़ांमध्ये हे काम केले जाईल.
लाखात एक’चे महत्त्वाचे टप्पे
1.    १७ नोव्हेंबर ते डिसेंबपर्यंत सर्वेक्षण व मूल्यमापन होणार
2.    शाळाबाह्य़ मुलांना शाळेपर्यंत पोचविणार
3.    गुणवत्ता सुधारणांसाठी शाळा व शिक्षकांकडे पाठपुरावा
4.    वस्ती व खेडय़ांच्या पातळीवरही विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन
5.     जानेवारी ते मार्च गुणवत्तावाढीचे प्रयत्न केले जाणार
प्रथम 
  • प्रथम ही  भारतात शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करणारी एक अभिनव शिक्षण संस्था आहे
  • प्रथम उच्च दर्जाचे, कमी खर्च लागणारे आणि सर्वत्र वापर होईल अशा  शिक्षण प्रणालीकडे  लक्ष केंद्रीत करते.
  • मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देण्यासाठी १९९५ मध्ये प्रथमची  स्थापना झाली.
  • भारतात पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण यातील समस्या लक्ष्य करण्यासाठी स्थापना करण्यात आली.
  • वार्षिक स्थिती शिक्षण अहवालअसर (Annual Status of Education Report -ASER) हा  ग्रामीण भारतातील शिक्षण व्यवस्थेबद्दलचा सर्वात मोठा  बिगर-सरकारी, घरगुती सर्वेक्षण अहवाल आहे आणि तो प्रथम शिक्षण फाउंडेशन द्वारा प्रदर्शित केला जातो.  





sources: loksatta, Pratham website

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights