स्वच्छ भारत अभियानासाठी सर्व सेवांवर अर्धा टक्का स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- १५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
- निर्णयामुळे केंद्राच्या तिजोरीत चार हजार कोटी रुपयांची भर
पडणार आहे.
- स्वच्छ भारत उपकर हा अन्य कोणताही अतिरिक्त कर नसून प्रत्येक
भारतीयाला स्वच्छ भारत अभियानात योगदान देता यावे म्हणूनअंमलबजाव णी करण्यात येत
आहे.
कशी केली जाईल उपकराची आकारणी?
- विद्यमान सेवाकराच्या व्यतिरिक्त हा कर असेल. विद्यमान सेवा कर १४ टक्के आहे
- अर्धा टक्का उपकर सर्व करपात्र सेवांवर लागू असेल
- १०० रुपयांना ५० पैसे उपकर असे त्याचे प्रमाण असेल
काय होणार परिणाम?
- सेवा कराअंतर्गत येणार्या सर्वच घटकांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे
- मोबाईल बिले, हॉटेल खर्च, विमान प्रवास आणखी महाग होणार
- सरकारकडे सुमारे चार हजार कोटी रुपये येणार. ज्यातून "स्वच्छ भारत‘संबंधित योजना मार्गी लागणार आहेत.
अधिभार विरुद्ध उपकर फरक
अधिभार
- अधिभार हा जास्तीचा कर असतो. तो करदायीत्वावर आकारला जातो.
साधारणता: एका ठराविक उत्पन्न पातळीनंतर अधिभार द्यावा लागतो.
- उदा. भारतात १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% कर आणि या ३०%
करावर अधिकचा १२% अधिभार म्हणजेच एकूण ३३.६% कर भरावा लागेल.
उपकर
- उपकर म्हणजे करावर कर. उपकर हा सर्व करदात्यांना भरावा लागतो त्यासाठी अधिभारासारखी कुठलीही उत्पन्न अट नसते.
- उपकर हा नेहमी कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीसाठी/कारणासाठी आकाराला जातो
- उदा. ३% शिक्षण उपकर. वरील उदाहरणाचा विचार केल्यास ३३.६% वर ३% शिक्षण उपकर पकडून त्या व्यक्तीस सरतेशेवटी एकूण ३४.६१% इतका कर भरावा लागेल.
No comments:
Post a Comment