देशामध्ये डिजिटल क्रांतीत सहभागी होण्यासाठी फेसबुक
आणि बीएसएनल ग्रामीण भारतामध्ये १०० ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार आहेत.
- सोशल नेटवर्क वेबसाईट फेसबुक देशाच्या ग्रामीण भागात १००
वायफाय साईटसाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) भागीदारीत दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च करणार आहे.
- बीएसएनएनकडून
बँडविड्थ विकत घेण्यासाठी फेसबुक दरवर्षी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
आहे.
- प्रत्येक गावासाठी वर्षाला ५ लाख रुपये
खर्च करण्यात येणार आहेत.
- ग्राहकांना पहिल्या अर्ध्या तासासाठी वाय फाय मोफत मिळेल आणि एकाचवेळी साधारणपणे २००० ग्राहक ही
सुविधा वापरू शकतील.
- बीएसएनलने
स्वत: आत्तापर्यंत ४५० वाय फाय हॉटस्पॉट उभारले असून मार्च २०१६ पर्यंत ही
संख्या २,५०० करण्याचे उद्दिष्ट्य
आहे.
- डिजिटल इंडिया या
केंद्र सरकारच्या धोरणानुसार वाय फायला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत
आहे.
डिजिटल इंडिया मोहीम काय आहे?
- अभियानामार्फत सरकारचा देशाला एक माहिती तंत्रज्ञानावर
आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा प्रयास आहे.
- डिजिटल लॉकर, ई-एज्युकेशन, ई-हेल्थ, ई-साईन आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यांसारख्या योजना आहेत..
- नागरिकांना सरकारी सुविधांचा आणि योजनांचा लाभ घेता यावा
यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर.
- माहिती तंत्रज्ञान व संवाद खाते यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार.
डिजिटल लॉकर-
- योजनेंतर्गत नागरिकांना त्यांची पॅनकार्ड, पासपोर्ट, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आदी डिजिटल कागदपत्रे सुरक्षितरीत्या साठवण्यास मदत होईल. त्यामुळे कागदाचा वापर कमी होऊन महत्त्वाचे दस्तावेज डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतील आणि नागरिकांची सोय होईल. विविध सरकारी खात्यांना त्यांचा सामायिक वापर करणे शक्य होईल. नागरिकांचा वेळ, जागा आणि कष्टांची बचत होईल.
No comments:
Post a Comment