Thursday, 5 November 2015

भारतात गुगलच्या 'प्रोजेक्ट लून' प्रकल्पामार्फत बलूनद्वारे इंटरनेट

इंटरनेटची सुविधा ग्रामीण आणि दुर्गम भागांत पोहोचवण्यासाठी 'प्रोजेक्ट लून' या गुगलच्या प्रकल्पाची चाचणी घेण्याकरिता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

'प्रोजेक्ट लून'

  • पृथ्वीच्या पृष्ठभागावर २० किलोमीटर उंचीवर मोठे फुगे (बलून) सोडून त्याद्वारे इंटरेनटची सेवा पुरवली जाणार आहे. पृथ्वीपासून साधारणत: वीस किमी उंच स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हे फुगे उडत असतात. ज्या प्रदेशात ते उडतात तेथील स्थानिक कंपन्यांशी करार करुन त्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन दिला जातो. साधारणत: १०० दिवस झाल्यानंतर ते उतरविले जातात.
  • न्यूझीलंड, कॅलिफोर्निया आणि ब्राझीलमध्ये
     या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली आहे.  श्रीलंकेनेही नुकतीच या प्रकल्पासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर इंडोनेशिया आणि भारतातही हे तंत्रज्ञान येणार आहे.
तंत्रज्ञानाची वैशिष्टे 
  • प्रत्येक बलूनद्वारे ४० किलोमीटर परिघातील क्षेत्रात वायरलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी देता येऊ शकते.
  • बलूनमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रणेला उर्जा देण्यासाठी सौर आणि पवन उर्जेचा वापर केला जातो.  
  • फोर जी सेवा देण्याचीही क्षमता या तंत्रज्ञानात असून, यातून प्रक्षेपित होणारे सिग्नल थेट मोबाइल हँडसेटवर रिसिव्ह होणार असल्याने भविष्यात कदाचित टॉवरचीही गरज उरणार नाही.
उद्देश
  • जगातील दोन तृतीयांशापेक्षा जास्त लोकसंख्या इंटनेटपासून वंचित आहे.
  • ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशात आजही संगणक आणि इंटरनेट पोहोचलेले नाही.
  • गुगलने बीएसएनएलच्या मदतीने फुग्याद्वारे इंटरनेट पुरविण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २.६ गीगा हर्टझ ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights