Sunday, 15 November 2015

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन दौरा
  • ब्रिटीश संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधन करणारे पहिले भारतीय पंतप्रधान.

भेटीदरम्यान विविध करार करण्यात आले त्याची थोडक्यात माहिती घेऊयात
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला नागरी आण्विक करार झाला आहे. 
  • व्होडाफोन भारतातील मोबाइल यंत्रणेत १.३ अब्ज पौंडाची गुंतवणूक करणार आहे, त्यामुळे पुणे व हैदराबाद येथे नवीन डेटा सेंटर सुरू होतील व एक पेमेंट बँक स्थापन केली जाईल.
  • लाइट सोर्स कंपनी येत्या पाच वर्षांत ३ गिगॅवॉट सौरऊर्जा निर्मितीसाठी २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
  • इंटेलिजंट एनर्जी कंपनीने स्वच्छ ऊर्जेसाठी १.२ अब्ड पौंडांचा करार केला असून, भारतात २७४०० दूरसंचार मनोरे उभारले जातील व हायड्रोजन इंधनघटावर वीज तयार केली जाईल.
  • किंग्ज कॉलेज हॉस्पिटल फाउंडेशन ट्रस्टयूके हेल्थकेअर यांच्या मदतीने चंडीगड येथे रुग्णालय सुरू केले जाईल. एकूण ११ रुग्णालये सुरू केली जाणार असून, त्यातील हे पहिले आहे. भारतातील आरोग्य क्षेत्रात १ अब्ज पौंडाची गुंतवणूक केली जाणार आहे.
  • इंडिया बुल्स कंपनी ब्रिटनमध्ये ६६ दशलक्ष पौंड गुंतवणूक करून ओकनॉर्थ बँक सुरू करणार आहे.
  • येस बँक व लंडन स्टॉक एक्सचेंज यांनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून, त्यानुसार ३०० दशलक्ष डॉलर्सचे ग्रीन बाँड (हरित बंधपत्रे) जारी केली जाणार आहेत.
  • मर्लिन एंटरटेन्मेंटची भारतात पहिल्यांदाच गुंतवणुकीची घोषणा. २०१७ पर्यंत नवी दिल्लीत मादाम तुसाँ वस्तुसंग्रहालय बांधण्यात येईल.

‘स्मार्ट पुणे’साठी ब्रिटनचा हातभार
  • द्विपक्षीय चर्चेनुसार अमरावती, पुणे आणि इंदूर या तीन शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी  यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लंडन येथे आंबेडकर स्मारकचे उद्घाटन झाले.
पंतप्रधान मोदी यांनी लंडन मध्ये १२ व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

अनिवासी भारतीयांना आपल्या परदेशी दौऱ्यात संबोधण्याची परंपरा कायम ठेवत लंडन शहरात असलेल्या वेम्बली या फुटबॉल मैदानावर आयोजित कार्यक्रमात संवाद साधला.
Sources: loksatta, sakal, IE.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights