आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ
समितीने गृह मंत्रालयाच्या गुन्हे आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम (Crime & Criminal
Tracking Network & Systems - CCTNS) प्रकल्पाच्या विस्ताराला
मंजुरी दिली असून
एकात्मिक
फौजदारी न्याय प्रणाली प्रकल्प
(Integrated Criminal Justice System- ICJS) राबवण्यासाठी ई-न्यायालये,
CCTNS प्रणालीला जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- यामुळे पारदर्शकता वाढून विविध फौजदारी न्याय प्रणाली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचा वेळ कमी होईल तसेच वेगवेगळ्या विभागातील माहितीच्या आदानप्रदानाला वेग प्राप्त होईल.
- पोलीस आणि नागरिक संवाद वाढणार आहे कारण या अंतर्गत विविध सेवा नागरिक पोर्टलद्वारे देण्यात येणार आहे.
CCTNS प्रकल्प:
- गुन्हे आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम (CCTNS) प्रकल्प पोलीस स्टेशन स्तरावरील कार्यक्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक व्यापक आणि एकात्मिक प्रणाली निर्माण करण्यासाठी २००९ साली सुरु करण्यात आला.
- राज्यात आणि देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारीविषयक माहिती शेअर करणे
- देशभरातून तसेच विविध राज्यांतील गुप्तचर माहितीचे एकत्रीकरण करणे.
- गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारी प्रतिबंध, कायदा आणि सुव्यवस्था देखभाल आणि वाहतूक व्यवस्थापन साधने यांच्यात सुधारणा करणे
- सार्वजनिक भागधारक/नागरिक यांना सहभागी करणे व त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सुधारणा करणे.
- गुन्हा संबंधित माहितीचे सोपे व जलद पण सक्षम विश्लेषण करणे.
- पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
No comments:
Post a Comment