चार वेळा जागतिक सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान
मिळवणारा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची भारतीय कंपनी टाटा मोटर्सचा
जागतिक ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
- टाटा मोटर्सने कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या प्रसिद्धीसाठी मेस्सीची निवड केली आहे.
- जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू असलेला मेस्सी प्रथमच एका भारतीय ब्रँडची जाहीरात करणार आहे.
- फुटबॉल व मेस्सी यांचा तरुणाईशी असलेला संबंध लक्षात घेऊन जागतिक पातळीवर तरूणांना उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
- टाटा मोटर्सने मेस्सीसोबत दोन वर्ष मुदतीचा करार केला आहे.
लिओनेल मेस्सी
- लिओनेल मेस्सी हा स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ यांच्या तर्फे फुटबॉल खेळणारा एक अर्जेंटाईन खेळाडू आहे.
- जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची गणती केली जाते.
- फुटबॉल इतिहासात सलग चार वेळा फिफा बल्लोन डीओर (Fifa Ballon d'Or) हा वर्षातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा पुरस्कार जिंकणारा तो एकमेव असा खेळाडू आहे.
- तीन युरोपियन गोल्डन शूज जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे.
No comments:
Post a Comment