१५
नोव्हेंबर २०१५ रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्लीतील अखिल भारतीय
आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences-एम्स) येथे
Affordable Medicines and Reliable Implants for Treatment (AMRIT-अमृत) योजनेअंतर्गत स्वस्त औषधे आणि विश्वसनीय इम्प्लांट उपलब्ध व्हावे यासाठी औषधांचे दुकान सुरु केले
आहे.
- अशा प्रकारच्या आउटलेटचा उद्देश कर्करोग आणि हृदय रोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च ५० टक्के ते ६० टक्क्यांनी कमी करणे होय.
- हे एक किरकोळ फार्मसी आउटलेट असणार असून कर्करोग आणि हृदय रोग या दोन आजारांसाठी येथे अत्यंत सवलतीच्या दरात औषधे आणि इम्प्लांट विकले जाणार आहेत.
- योजनेअंतर्गत कार्कारोगासंबंधित २०२ तसेच हृदयविकाराशी संबंधित १८६ औषधे आणि १४८ प्रकारचे हृदय इम्प्लांट अतिशय स्वस्त दरांमध्ये विक्री करण्यात येणार आहे.
- योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारच्या मालकीच्या HLL Lifecare लिमिटेड कंपनीशी करार करण्यात आला आहे.
- दिल्लीतील या उपक्रमाचा अभ्यास करून यावर आधारित हा उपक्रम HLL च्या भागीदारीने केंद्र सरकारच्या इतर रुग्णालयात आणि प्रादेशिक कर्करोग केंद्रात सुरु करण्यात येईल.
No comments:
Post a Comment