Wednesday, 11 November 2015

रघुराम राजन ‘बॅंक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट‘च्या मंडळावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्त

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची ‘बॅंक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट‘च्या मंडळावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ‘इंटरनॅशनल सेटलमेंट बँके‘चे (बीआयएस) मुख्यालय स्वित्झर्लंडमधील बसेल (Basel) येथे आहे. 
  • बीआयएसच्या मंडळात अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्ष जॅनेट येलेन, बॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कार्नी, बँक ऑफ जपानचे गव्हर्नर हारुहिको कुरोदा यांचाही समावेश आहे. 
  • डॉ. रघुराम राजन यांना १० नोव्हेंबर २०१५ पासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी उपाध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
  • बीआयएस मंडळाची वर्षातून किमान सहा वेळा बैठक होते. 

‘इंटरनॅशनल सेटलमेंट बँक‘ (बीआयएस)
१७ मे १९३० रोजी स्थापना झालेली, आंतरराष्ट्रीय सेटलमेंट बँक (बीआयएस) जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था आहे.
बीआयएसमध्ये  ६० केंद्रीय बँकांचा समावेश असून त्या एकत्र जगातील 'जीडीपी' च्या सुमारे ९५% जीडीपिचे प्रतिनिधीत्व करतात.
BIS जागतिक पातळीवर विविध देशांच्या मध्यवर्ती बंकांमध्ये बँकांमध्ये चलन धोरण आणि आर्थिक स्थिरता राखण्याचे काम करते.
इंटरनॅशनल सेटलमेंट बँके‘चे (बीआयएस) मुख्यालय स्वित्झर्लंडमधील बसेल (Basel) येथे असून दोन प्रादेशिक कार्यालये हाँगकाँग आणि मेक्सिको येथे आहेत. 
आपल्याकडे विविध बँकाना लागू केलेले  बेसल निकष जे बँकांच्या किमान भांडवल पर्याप्ततेशी संबंधित आहेत ते बीआयएस बँकेने घोषित केले आहेत.
बीआयएस कार्ये-
  • विविध केंद्रीय बँकात  आपापसांत चर्चा आणि सहकार्य वाढविणे.
  • आर्थिक स्थिरतेसाठी जबाबदार संस्था आणि इतर अधिकारी यांच्यात संवाद घडवणे.
  • आर्थिक आणि आर्थिक स्थिरता संबंधित विषयांवर संशोधन करून त्यासंबंधित धोरण ठरवणे
  • जगातील बँकांसाठी सुरचित वित्तीय सुरक्षा जाळे निर्माण करणे.
  • आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात एक विश्वस्त म्हणून सेवा पुरवणे

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights