"ब्रॅंड फायनान्स" ह्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील
सर्वाधिक व्यापार मूल्य असणाऱ्या १०० मोठय़ा देशांमध्ये भारताचा ७वा क्रमांक लागतो.
व्यापारमूल्य कसे मोजतात?
जगातील आघाडीच्या कंपन्यांचे व्यापारमूल्य जोखण्याच्या प्रक्रियेनुसारच "ब्रॅंड फायनान्स" जगातील आघाडीच्या शंभर देशांच्या आर्थिक
क्षमतेची आणि व्यापारमूल्याची तपासणी करते. त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार,एकूण राष्ट्रीय
उत्पन्न, देशातील सर्व ब्रँड्सच्या विक्रीचे पुढील पाच
वर्षांतील अंदाज अशा निकषांचा समावेश असतो.
२०१५ ब्रँड
फायनान्स रिपोर्टची वैशिष्टे:
- यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर असून, त्यांचे व्यापारमूल्य १९.७ अब्ज डॉलर आहे.
- आर्थिक मंदीमुळे चीनचे व्यापारमूल्य घटले असले, तरी दुसरा
क्रमांक कायम
राखण्यात त्यांना यश आले आहे
- ३) जर्मनी ४) ब्रिटन ५) जपान ६) फ्रान्स
- पहिल्या पाच देशांची क्रमवारी गेल्यावर्षीप्रमाणेच आहे.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत फ्रान्स आणि भारताने एका क्रमांकाने सुधारणा केली आहे.
- यादीत भारत सातव्या स्थानावर असला तरी व्यापारमूल्यात झालेली ३२ टक्के वाढ ही पहिल्या वीस देशांच्या तुलनेत सर्वाधिक
आहे.
- "ब्रिक्स" देशांपैकी फक्त भारतालाच आपले व्यापारमूल्य वाढविण्यात यश आले असून ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण
आफ्रिका यांना घट सोसावी लागली आहे.
- विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये चीननंतर जगाची भारतालाच पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- भारताला हे यश मिळण्यामागे “अतुलनीय भारत” या घोषवाक्याचा फायदा झाल्याचे “ब्रॅंड फायनान्स” ने म्हटले आहे.
- जगातील आघाडीच्या ब्रँडचे मूल्यांकन आणि धोरण सल्लागार म्हणून काम करणारी स्वतंत्र संस्था आहे. १९९६ मध्ये स्थापना झाली.
- मुख्यालय- लंडन शहर
No comments:
Post a Comment