मिशन इंद्रधनुष या कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य आणि भारतीय
कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे २५ डिसेंबर २०१४ रोजी करण्यात आली.
- मिशनचा उद्देश सर्व दोन वर्षे वर्षाखालील मुलांना तसेच गर्भवती महिला यांना, लसीकरण करून पूर्णपणे टाळता येतील असे सात रोगांसाठी लसीकरण करणे हा होय.
सात रंगाचा समावेश असलेल्या इंद्रधनुष्याप्रमाणे खालील ७
रोगांविरोधात लसीकरण करण्यात येणार आहे.
१. घटसर्प
२. डांग्या खोकला
३. धनुर्वात
४. क्षयरोग
५. पोलिओ
६. हिपॅटायटीस ब
७. गोवर
याचबरोबर काही निवडक राज्यांमध्ये जापनीज इंसेफालीटिस (Japanese
Encephalitis) आणि हिमोफ़िलस इंफ्लूएन्झा ब (Haemophilus influenza type B:HIB) साठीची लस पुरवली जाणार आहे.
No comments:
Post a Comment