Thursday, 5 November 2015

एपीजे अब्दुल कलाम अमृत योजना

महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागातील मुलांच्या कुपोषणावर अंकुश ठेवण्यासाठी  राज्यातील आदिवासी भागातील  गरोदर व स्तनदा महिलांना पोषण आहार प्रदान करण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम अमृत योजना मंजूर केली आहे.

  • या योजने अन्तर्गत प्रत्येक गर्भवती स्त्री आणि माता यांना  किमान एक वेळ  पूर्ण गरम पौष्टिक जेवण प्रदान केले जाणार आहे.

काय आहे योजना ?
  • लाभार्थींना मोफत गरम शिजवलेले अन्न गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीपासून ते मुल जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या ३ महिन्यांपर्यंत अशा सहा महिने कालावधीसाठी प्रदान केले जाणार आहे. जेवणात अधूनमधून डाळी, तांदूळ, फळे, भाजीपाला, दूध आणि उकडलेले अंडी यांचा समावेश असेल.

योजनेचा उद्देश
  • योजनेच्या अंमलबजावणीमुले  बाळांना  स्तनपान करवण्याच्या काळात फायदा होऊन अखेरीस आदिवासी मुलांच्या कुपोषणावर अंकुश ठेवण्यास मदत होईल. 

योजनेची अंमलबजावणी
  • अंगणवाडी कामगार, आदिवासी महिला आणि स्थानिक जेवण समित्या यांच्याद्वारे योजना राबविण्यात येईल.
  • महिला व बाल कल्याण विभाग योजनेअन्तर्गत अंगणवाडी सेविकेंच्या पगारावर रुपये १० कोटी खर्च करणार आहे.
  • चार सदस्यीय जेवण समिती १६ जिल्ह्यांतील  प्रत्येक आदिवासी गावात स्थापन करण्यात येणार आहे.
  • ग्रामपंचायतीतील महिला सदस्याची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येईल तसेच दोन सदस्य गर्भवती किंवा स्तनदा माता एक अंगणवाडी कार्यकर्ता यांचा समितीत समावेश केला जाईल.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights